राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात मोठे बदल, मोदी सरकार ऍक्शन मोडमध्ये, माजी रॉ प्रमुख आलोक जोशी अध्यक्ष

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीमध्ये मोठे बदल केले आहेत. रॉ अर्थात रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे माजी अध्यक्ष आलोक जोशी यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. या समितीत इतर सहा सदस्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

एनएसएबी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विविध प्रकारची गुप्त माहिती पुरवते. सरकारच्या बाहेरील प्रतिष्ठत व्यक्ती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात सहभागी असतात.

समितीत यांचा समावेश

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीत माजी एअर कमांडर बी. एम. सिन्हा, माजी लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह, रिअर अॅडमिरल माँटी खन्ना, राजीव रंजन वर्मा, परराष्ट्र विभागाचे माजी अधिकारी बी व्यंकटेश वर्मा यांच्यासह लष्करी आणि पोलीस सेवेतील निवृत्त अधिकाऱयांचा समावेश आहे.