
सध्या बोर्डाच्या परीक्षेचे दिवस आहेत. या दिवसात मुले दिवसभर उत्साही आणि एकाग्र राहावी, त्यांना थकवा वाटू नये म्हणून त्यांच्या आहारावर विशेष लक्ष द्यायला हवे. परीक्षेच्या दिवसात नाश्ता टाळू नये. पण मसालेदार, जंक फूड टाळावे.
नाश्त्यामध्ये दूध, फळे, पोहे उपमा आदीचा समावेश करावा. मुलांच्या आहारात आक्रोड-बदामाचा समावेश करावा. मुलांना पालेभाज्या खायला द्याव्यात. इन्स्टंट एनर्जी देणारा आहार असावा. जेणेकरून मुलांना फ्रेश वाटेल.





























































