
बेस्टने प्रवाशांच्या सोयीकरिता बसफेऱयांच्या संख्येनुसार बसपास वितरण सेवा सुरू केली आहे. बेस्टच्या ‘चलो मोबाईल ऍप’ या स्मार्ट कार्डमुळे प्रवास खर्चात पन्नास टक्के बचत होत आहे.
पाच किलोमीटरपर्यंतच्या दैनंदिन प्रवासासाठी दहा रुपये तिकीट दर आहे. 100 फेऱयांसाठी 28 दिवसांसाठीच्या बसपासचा दर रु.249 असल्याने प्रतिफेरी दर 2.50 रुपये होतो. म्हणजेच प्रत्येकी दोन फेऱयांकरिता 5 रुपये लागत असल्याने या दैनंदिन प्रवासभाडय़ात 50 टक्के बचत होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रवाशांच्या सोयीकरिता बेस्ट उपक्रमाने बसफे-यांच्या संख्येनूसार बसपास वितरण सेवा सुरु केली आहे.





























































