पावसाळ्यानंतर ‘एमएमआरडीए’ची महामार्गांवर रस्तेदुरुस्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाऊस थांबल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर रस्तेदुरुस्तीला सुरुवात केली आहे. शनिवारी रात्रीपासून या दुरुस्ती कामाला सुरुवात झाली. वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून रात्रीच्या वेळी ही रस्तेदुरुस्ती केली जात आहे. पहिल्या टप्प्यात खेरवाडी उड्डाणपुलावरील उत्तरेकडच्या 300 मीटर रस्त्याची दुरुस्ती केली गेली. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि भेगा बुजवल्या गेल्या. त्यामुळे हा सुमारे दोन हजार चौरस फुटांचा रस्ता वाहतुकीसाठी चांगला झाल्याचा दावा एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी केला. पाऊस झाला नाही तर महामार्गांवरील इतर दुरुस्तीकामही केले जाणार आहे.