रुग्णांकडून जादा बिल आकारणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कल्याण-डोंबिवली शहरातील खासगी रुग्णालयात आँगस्टपासून ऑडिटरची नियुक्ती करण्यात आली होती. या ऑडिटरमार्फत 24 रुग्णालयांची बिलांची तपासणी करून 57 लाख रुपयांची हॉस्पिटलची बिले कमी करून रुग्णांना परत करण्यात आली. कोरोना काळात रुग्णांनी जादा रकमेची बिले आकारल्याच्या बाबत अमित साटम, अजय चौधरी, सदा सरवणकर व अन्य सदस्यांनी प्रश्न केला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 90 रुग्णालयांत ऑडिटर नियुक्त करण्यात आले होते. रुग्णालयाच्या ऑडिटनंतर 24 लाख रुपयांची वैद्यकीय उपचारांची बिले कमी करून रुग्णांना परत करण्यात आल्याची माहिती उत्तरात दिली आहे.