शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी एसटीच्या जादा बसेस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना प्रतिनिधी । मुंबई

किल्ले रायगड येथे ५ व ६ जून रोजी साजरा होणारा ३४५ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला येणाऱया शिवभक्तांसाठी एसटी महामंडळाने प्रत्येक जिल्ह्यातून जादा बसेस सोडण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार वाहतूक विभागाने ४, ५ व ६ तारखेला मागणीप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातून जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने कोल्हापूरचे शिवाजी महाराजांचे वंशज व राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मंत्री रावते यांच्याकडे शिवराज्याभिषेकाला येणाऱया शिवभक्तांना प्रत्येक जिह्यातून एसटी बसेस सोडण्याची विनंती एका पत्राद्वारे केली होती.