वजन वाढतंय, तर सावधान! कारण ‘गोड’च अधिक ‘तिखट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
वजन प्रमाणाबाहेर वाढले असल्यास ते कमी करण्यासाठी घरच्या घरी पर्याय म्हणजे हळद. हळदीचे पाणी फायदेशीर ठरते.

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गोड कोणाला खायला आवडत नाही… प्रत्येक जण गोड पदार्थ खाण्यासाठी तयार असतो. जिलेबी, गुलाबजाम, मिठाई, केक, आयस्क्रिमचं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. हे पदार्थ चवीला गोड असले तरी शरीरासाठी मात्र तिखट आहेत. मिठाई, केक, आईस्क्रिम, कोल्ड्रींक याचा वाईट परिणाम शरीरावर होतो. परिणामी वजनात वाढ होते आणि पोटाचा घेर वाढतो. दोन्ही बाजूंनी टायर सुटतात. हा पण वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर अशा पदार्थांवर किती प्रमाणात ताव मारायचा आणि खाऊगीरवर कसं नियंत्रण ठेवायचं हे शिकावं लागेल. आणि हे कोणा दुसऱ्याकडून नाही तर स्वत:कडूनच शिकायचं आहे. कारण आपणच आपल्यावर अधिक योग्यपणे नियंत्रण ठेऊ शकतो. त्यासाठी या चार गोष्टी नक्की टाळा

– आपल्याकडील कोणताही सण, उत्सव मिठाई आणि गोड धोड शिवाय पूर्ण होत नाही. यावेळी बाजारात विविध पदार्थ तयार मिळतात. परंतु बाजारातील मिठाईमध्ये तुपाचा आणि साखरेचा वापर अधिक केलेला असतो. आपणही चोपून चापून ही मिठाई खातो. त्यामुळे वजन भराभरा वाढते. त्यामुळे शक्यतो घरातील, कमी साखरेत बनवलेली मिठाई खावी.

– अनेकांना कोल्ड्रींक आणि जंक-फूड शिवाय दिवस चांगला गेला असे वाटत नाही. परंतु या सवयी घातक आहेत. याच्या सेवनामुळे मधुमेह, वजन वाढणे अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक वाढते. कोल्ड्रींकमुळे किडनीवरही परिणाम होतो. किडनी फेल होण्याची शक्यता वाढते.

– केकचं नाव काढलं तरी तोंडाला पाणी येतं. लहानांपासून मोठ्यांना केक खावा वाटतो. परंतु केक आणि पेस्ट्रीवर असणारी क्रिम आणि आयसिंगमुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढतं. यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.

– आयस्क्रिम तर सर्वांनाच आवडते. परंतु यात अधिक प्रमाणात कॅलरीच आणि साखर असल्याने हार्ट अटॅकची शक्यता बळावते. फॅटचे प्रमाणही जास्त असल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. यामुळे स्ट्रोक आणि इतर समस्या वाढतात. गोडीमुळे वजन वाढण्याची समस्याही होते.