
जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलीफापेक्षा मोठ्या आकाराचा उल्कापिंड ( Asteroid 1997 BQ) गुरुवारी मध्यरात्रीनंतर पृथ्वीच्या कक्षेजवळून पुढे निघून गेला आहे. त्यामुळे पृथ्वीवरील मोठा धोका टळला आहे. या उल्कापिंड पृथ्वीच्या कक्षेच्या जवळून जाण्याची माहिती अमेरिकी अंतराळ संस्था नासाने दिली होती. या उल्कापिंडाची दिशा आणि वेग यात काही बदल झाल्यास आणि उल्कापिंड पृथ्वीच्या कक्षेत आकर्षित झाल्यास मोठा विनाश होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे या उल्कापिंडाकडे खगोलतज्ज्ञांचे लक्ष लागले होते.
हा उल्कापिंडाचा समावेश (Asteroid 1997 BQ)अंतराळातील सर्वात मोठ्या आणि धोकादायक अशा अपोलो या वर्गात करण्यात येतो. हा उल्कापिंड पृथ्वीजवळून जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोशोधक आणि अंतराळ संस्था याचा वेग आणि दिशेवर लक्ष ठेवत होत्या. हा उल्कापिंड 11.6 किलोमीटर प्रती सेकंद वेगाने गुरुवारी रात्री 1.15 वाजण्याच्या सुमारास पृथ्वीच्या कक्षेजवळून पुढे निघून गेला आहे. हा उल्कापिंड 1500 मीटर लांब आणि बुर्ज खलीफा इमारतीपेक्षा मोठा म्हणजे 830 मीटर रुंद आहे. गेल्या काही महिन्यात पृथ्वीच्या मार्गात अनेक उल्कापिंड आले आहेत. मात्र, त्यांच्यामुळे कोणेतेही नुकसान झालेले नाही. मात्र, या उल्कापिंडाबाबत संशोधकांनी आणि नासाने इशारा दिला होता.
एक किलोमीटरपेक्षा मोठा उल्कापिंड पृथ्वीवर धडकल्यास पृथ्वीवर मोठा विनाश होऊ शकतो, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या उल्कापिंडाबाबत आणि त्याच्या प्रंचड वेगामुळे पृथ्वीला धोका असल्याचा इशारा देण्यात आला होता.मात्र, आता हा उल्कापिंड पृथ्वीच्या कक्षेच्या पुढे गेल्याने धोका टळला आहे. हा उल्कापिंड पृथ्वीपासून 6.156 मिलियन किलोमीटर अंतारावरून पुढे निघून गेला. या उल्पापिंडावर नासाची नजर होती. इतर उल्कापिंडापेक्षा हा उल्कापिंड मोठा असल्याने संभाव्य धोकाही जास्त होता, असे नासाने सांगितले. हा उल्कापिंड पृथ्वीला न धडकता, पृथ्वीच्या खूप जवळून गेला असता तरी मोठी त्सुनामी आली असती, असे संशोधकांनी सांगितले. येत्या 100 वर्षात सुमारे 22 उल्कापिंड पृथ्वीच्या कक्षेच्या खूप जवळून जाणार असल्याचे नासाने सांगितले.




























































