
Facebook च्या सर्व्हिसेस पुन्हा डाउन झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या महिन्यात असं दुसऱ्यांदा झालं आहे जेव्हा Facebook च्या सर्व्हिसेस डाउन झाल्या आहेत. Facebook च्या तिन्ही अॅप्सच्या सर्व्हिस डाउन झाल्या आहेत. यामध्ये सोशल नेटवर्क फेसबुक, इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp आणि फोटो शेअरिंग अॅप Instagram यांचाही समावेश आहे.
तिन्ही प्लॅटफॉर्म्स काल रात्री काहीवेळासाठी ऑफलाइन झाले होते. काही वेळाने या सर्व सर्व्हिसेस सुरळीत झाल्या. सर्व्हिस डाउन झाल्याची तक्रार मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर आणि डाउन डिटेक्टर वेबसाइटवर तक्रारी येऊ लागल्या. काही यूझर्सच्या नुसार तिन्ही अॅप्स Facebook, WhatsApp आणि Instagram काही मिनटांसाठी आउटेजचे शिकार झाले होते. या दरम्यान अनेक यूझर्स या अॅप्सचा वापर करू शकत नव्हते.
Facebook च्या प्रवक्त्याने सांगितले की, काही कॉन्फिगरेशन चेंजमुळे फेसबुक सर्व्हिस काही काळासाठी काही लोकांना वापरता येत नव्हते. याप्रकरणी त्यांनी सांगितले की नक्की काय बिघाड आहे तो तपासून दुरुस्ती करू.
डाउन डिटेक्टर वेबसाइटनुसार Facebook, WhatsApp आणि Instagram असंख्य लोकांना बराच काळ उपयोगात आणता आले नाही. जगभरातील यूझर्सना याचा फटका बसला. फेसबुक यूझर्ससह याचा प्रभाव Instagram आणि WhatsApp यूझर्सवर देखील पडलेला आहे.
आउटेज दरम्यान सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर एक एरर मेसेज दिसत होता. या मेसेज मध्ये We’re sorry, but something went wrong. Please try again असं दिसत होतं. Instagram वर देखील असाच एक मेसेज येत होता. यूझर्ससाठी या सोशल मीडिया प्लेटफॉर्म्ससाठी टाइमलाइन लोड होत नव्हते.
WhatsApp यूझर्सना देखील अशाच त्रासाला सामोरं जावं लागत आहे. यामुळे यूझर्स मेसेजिंग प्लेटफॉर्मवर कोणताही मेसेज सेंड किंवा रिसीव्ह करू शकत नव्हते. किंवा त्यासाठी खूप वेळ लागत होता. तिच गत फेसबुक मेसेंजरचीही देखील झाली होती. या महिन्यात दुसऱ्यांदा फेसबुकसह त्याचे अन्य अॅप्स डाउन झाले होते. वारंवार येणाऱ्या अडचणीमुळे युझर्स वैतागले होते.




























































