आरारा… भाऊंच्या फोटोंचा होतोय दंगा, पोरींची कविता घालतेय पिंगा!

कोरोनाच्या बातम्या, पोस्ट वाचून येणारी काहीशी नकारात्मकता आणि निराश भावना दूर करण्यासाठी सध्या सोशल मीडियावर इंटरेस्टींग ट्रेंड चालवण्यात येत आहे. त्यामुळे नेटकऱयांच्या रिकाम्या मेंदूला काम मिळाले आहे, त्यांची क्रिएटीव्हीटी उफाळून आली आहे. जुने फोटो फेसबुकवर टाकून त्यावर कविता लिहिण्याचा ट्रेंड सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या काव्य प्रतिभेला बहर आला आहे. ‘भाऊच्या फोटोंचा होतोय दंगा, पोरींची कविता घातलेय पिंगा’, असंच चित्र फेसबुकवर दिसत आहे.

सोशल मीडियावर कधी, कोणता ट्रेंड निघेल या भरवसा नाही. सध्या तर लॉकडाऊन सुरू आहेत. लोक घरांत बसले आहेत. त्यांना थोडं हलकं करावे, म्हणून जुन्या फोटोंचा ट्रेंड सुरू करण्यात आला. तो कुणी आणि कसा सुरू झाला, हे सांगता येत नाही. कुणाला ते जाणूनही घ्यायचे नाही. फक्त कविता पाडायच्या आहेत. आणि झालेही तसेच. फेसबुकवर कुणी जुना फोटो शेअर करायचा अवकाश, त्याखाली कवितांचा कीस पडू लागतोय. कशाला कशाचा ताळमेळ नसलेल्या, र ला र आणि ट ला ट जोडून केलेल्या हलक्याफुलक्या कविता नेटकर्यांना प्रेमात पाडू लागल्या आहेत. त्यातही भाऊच्या कविता जास्त फेमस झाल्या आहेत.

आठवतं का आपली पहिली भेट?

आठवतं का आपली पहिली भेट कधी झाली? हा सवालात्मक ट्रेंड सध्या खूप जोरात आहे. पोस्टच्या सुरवातीलाच आपले नाव टाकून आपण मला ओळखलेच असेल असे म्हणून आपण पहिल्यांदा केव्हा, कुठे भेटलो, त्यावेळी आपल्यामध्ये काय संवाद झाला, याचे निमित्त कोणते होते. त्यावेळी काही देवाणघेवाण झाली का, माझ्याविषयी आपल्याला काय वाटतं, असे आवाहन करणारी ही पोस्ट आहे. त्यालाही फेसबुकवर खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

एक छोटीसी प्रेमकथा

फेसबुकवर सध्या एक छोटीसी प्रेमकथा हा ट्रेंडही गाजत आहे. एका ओळीत हलकीफुलकी विनोदी प्रेमकथा लिहायची.

आपली प्रतिक्रिया द्या