फेसबुकने ‘टिकटॉक’ सारखे अ‍ॅप केले बंद; मात्र इंस्टाग्रामवर असेच एक फिचर लॉन्च

हिंदुस्थानात टिकटॉक अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र असे असताना टिकटॉक सारखे अनेक नवीन अ‍ॅप समोर येताना दिसत आहेत. यातील काही अ‍ॅप हिंदुस्थानातील आहेत, तर काही अ‍ॅप बाहेरील. मात्र आता फेसबुकने टिकटॉक सारख्या अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकने Lasso नावाचे एक अ‍ॅप लॉन्च केले होते. हे अ‍ॅप टिकटॉक सारखे काम करते. या अ‍ॅपला हिंदुस्थानात लॉन्च करण्यात आले नव्हते. मात्र आता फेसबुकने हे अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी टिकटॉक सारख्या एका नवीन अ‍ॅपवर काम करत आहे. फेसबुकने नुकतेच इंस्टाग्रामवर Reels नावाचे फिचर लॉन्च केले आहे. जे टिकटॉक सारखेच काम करते. फेसबुकने Lasso व्यतिरिक्त Hobbi हे अ‍ॅपही बंद केले आहे. Hobbi अ‍ॅप Pinterest सारखे होते. या दोन्ही अ‍ॅपला कंपनीने एक्सपेरिमेंट म्हणून लॉन्च केले होते. जे आता बंद करण्यात आले आहे.

Reels ला सध्या इंस्टाग्रामवर फिचर म्हणून लॉन्च करण्यात आले आहे. म्हणजेच कंपनीने अद्याप यावर आधारित स्टँडअलोन अ‍ॅप बाजारात आणलेले नाही. या फीचरचा वापर करून वापरकर्ते इंस्टाग्रामवर शॉर्ट व्हिडीओ शूट करू शकतात आणि त्यामध्ये गाणे ही सेट करू शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या