चॅटिंगची मजा वाढणार, फेसबुकचे नवे मॅसेंजर ऍप लवकरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फेसबुक युजर्ससाठी एक खूशखबर आहे. फेसबुक सध्या नव्या मॅसेंजिंग ऍपवर काम करीत आहे. त्यामुळे आपल्याला फ्रेंड्सना अधिक गोष्टी शेअर करता येतील. ‘थ्रेड’ असे या ऍपचे नाव असून इन्स्टाग्रामसाठी फेसबुक हे नवे ऍप आणण्याच्या तयारीत आहे. इन्स्टाग्रामवरील युजर्स ‘थ्रेड’ ऍपच्या मदतीने क्लोज फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या लोकांसोबत लोकेशन, स्पीड, बॅटरी लाईफ शेअर करण्यासाठी ‘इन्व्हाइट’ करता येणार आहे. फेसबुकने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. फेसबुकच्या मदतीने आता सिनेमांचे तिकीटही बुक करता येणार आहे. मूव्ही रिमाईंडर ऍड्स आणि मूव्ही शोटाईम ऍड्स हे दोन फीचर लवकरच लाँच करण्यात येणार आहेत. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तो बघण्याचे रिमाइंडर नोटिफिकेशन लवकरचा युजर्सना मिळणार आहे. त्यासाठी चित्रपटाची जाहिरात फेसबुकवर दिसत असताना युजर्सला इंटरेस्टेड या बटणावर क्लिक करावे लागेल.