सीईटीची नोंदणी ऍपवरून, वेळेत सीईटी पूर्ण करण्याचे टार्गेट; 18 सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) यंदा पहिल्यांदाच उमेदवारांना सीईटी परीक्षेच्या नोंदणीची प्रक्रिया करण्यासाठी अॅपच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱया सीईटी परीक्षाचे वेळापत्रक आज जाहीर केले. सीईटी सेल आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी याबाबतची माहिती दिली.

राज्यात उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष, कृषी, कला संचालनालय आदी शिक्षणाच्या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांच्या 18 अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा सीईटी सेलमार्फत घेतल्या जाणार आहेत. परीक्षा कार्यक्रमानुसार जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व परीक्षा आणि त्यांचे निकाल जाहीर केले जाणार असल्याने ऑगस्ट महिन्यात राज्यातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये आणि त्यांचे शैक्षणिक सत्र सुरू होईल. त्यासाठी सीईटी सेलने नियोजन केले असल्याची माहिती देण्यात आली.