नामांकित कंपनीच्या नावाने बनावट एम्फ्लीफायरची विक्री, तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी आपला फास अधिक घट्ट आवळायला सुरुवात केल्यानंतर गुन्हेगारांनी आता आपली मोडस बदलली आहे. मोठ दुकान थाटून नामांकित कंपनीच्या नावे बनावट साहित्य विकण्यास काही आरोपींनी सुरुवात केली आहे.

अशाच एका रेकॉर्डवरच्या आरोपीला आर्थिक गुन्हे नियंत्रण कक्षाने दणका दिला आहे. डी.बी.मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अजंता इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात नामांकित कंपनीच्या नावाखाली बनावट एम्फ्लीफायरर्स विकले जात असल्याची खबर नियंत्रण कक्षाचे प्रभारी निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली.

त्याआधारे पाटील यांनी एपीआय वंगगाटे तसेच वलेकर, दरेकर, डोईफोडे, कोळी, विशाल यादव व पथकाने त्या दुकानावर छापा टाकला. तेव्हा तेथे 29 लाख 54 हजार किमतीचे 52 युनिट बनावट एम्फ्लीफायर जप्त केले.

तसेच हा काळाबाजार करणारा इरफान युनुस नमकवाला याला बेड्या ठोकल्या. नमकवाला हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून त्याच्याविरोधात गंभीर दुखापत, हत्या, मारहाण, फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या