राज्यात कुठेही जाण्यासाठी झटपट अन् स्वस्तात पास, दोघांना अटक

745

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोक घाबरून शहर सोडू लागले आहेत. अनेकजण शासनाचा पास मिळवून गावाकडे धाव घेऊ लागले आहेत. नेमका याचाच फायदा उचलत दोघे भामटे ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या नावाने हुबेहूब बनावट ई पास बनवून त्याचा गैरफायदा घेत होते. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-1 ने त्या दोघांचा धंदा उद्धवस्त केला.

कल्याण, उल्हासनगर येथील काही लोक आर्थिक फायद्यासाठी राज्यात कुठेही प्रवास करण्यासाठी नागरिकांना ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या नावाने अनधिकृत ई पास मिळवून देत असल्याची माहिती युनिट 1 ला मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक विनायक मेर, निरीक्षक महेश तावडे व पथकाने तपास केला असता कल्याण येथील विकल्प टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचा मालक विकास महाजन हा बनावट ई पास बनवून ते विकत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला ताब्यात घेतल्यानंतर उल्हासनगरला राहणारा अनिल यशवंते हा विकासला बनावट पास बनवून देत असल्याचे निष्पन्न झाले.

आपली प्रतिक्रिया द्या