एसटीत ‘फेक न्यूज’चा पूर… क्हॉट्सऍपवर फिरतायत मंडळाच्या नावानिशी खोटे संदेश

403
st bus
फाईल फोटो

कोरोनाच्या केसेस वाढत असताना राज्याच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी एसटी महामंडळात चक्क ‘फेक न्यूज’चा पूर आला आहे. एसटी महामडळाच्या गाडय़ांना अद्यापही जिल्ह्यांची हद्द ओलांडण्याची परवानगी दिली नसतानाही एसटीचा आंतर जिल्हा प्रवास सुरू झाल्याचे संदेश मोबाईलवरून फॉरवर्ड होऊ लागल्याने एसटी महामंडळाला ही ‘फेक न्यूज’ आहे, असा खुलासा करण्याची वेळ आली आहे.

कोरोना लॉकडाऊननंतर बंद झालेली एसटीची प्रवासी वाहतूक आता केवळ गाव ते तालुका आणि आता तालुका ते जिल्ह्यांचे ठिकाण अशीच सुरू आहे. ही वाहतुक कोरोनाचे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून केवळ पन्नास टक्के प्रकासी क्षमतेने सुरू आहे. लांबपल्ल्यांच्या ट्रेन 12 ऑगस्टपर्यंत बंद असल्याने निदान एसटीने कोकणात जाण्याचे चाकरमान्यांचे बेत रचले जात आहेत. या वातावरणात व्हॉट्सअपवर ‘फेक न्यूज’चा अक्षरश पूर आला आहे. गणपतीच्या वाहतूकी संदर्भात अजून काही निर्णय झाला नसताना या बातम्या पसरत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

– एसटीने पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते सोलापूर असा एसटी प्रवास सुरू झाल्याची बातमी काल दिवसभर विविध व्हॉट्सअप ग्रुपवर फिरू लागल्याने जनसंपर्क विभागाने ही ‘फेव न्यूज’ असल्याचे स्पष्ट केल्यानंतर पुन्हा विविध ग्रुपवर हीच बातमी ‘फेक न्यूज’ अशा स्टॅम्पने फिरू लागली. त्यानंतर आज ‘कोकण एसटी प्रेमी’ नावाने 3 जुलैपासून एसटीतून प्रवस करणाऱया सर्व प्रवाशांवडून मूळ तिकीट दरानुसार प्रवास भाडे आकारण्यात येईल, अशी बातमी पसरली. एसटीचा आंतर जिल्हा प्रवास सुरू होण्यावरून अनेव वेगवेगळ्या बातम्या पसरत आहेत. त्या सर्व खोटय़ा असल्याचे महामंडळाला सांगावे लागत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या