युद्धजन्य परिस्थितीत फेक न्यूजचा सुळसुळाट; सरकारने तक्रारीसाठी जारी केला व्हॉट्सअॅप क्रमांक आणि ई-मेल आयडी

देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांकडून हल्ल्यांसंबधीचे बनावट व्हिडीओ आणि पह्टो शेअर करत चुकीचे दावे केले जात आहेत. हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर फेक न्यूजचा सुळसुळाट रोखण्यासाठी आणि खोटी माहिती पसरू नये यासाठी राज्य सरकारकडून तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांक आणि ई-मेल आयडी देण्यात जारी आला आहे.

हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना मोठय़ा प्रमाणात खोटय़ा बातम्या परसरवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारकडून काही उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच दोन्ही देशांमधील तणावाच्या काळात एखादी माहिती शेअर करण्यापूर्वी सामान्य नागरिकांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दलदेखील सरकारने माहिती दिली आहे.

हे करा
– केवळ अधिकृत मार्गदर्शक सूचना, मदत क्रमांक संपर्क आणि मदतीविषयीची पडताळून पाहिलेली माहिती सामायिक करा.
– कोणतीही बातमी सामायिक करण्यापूर्वी त्याची अधिकृत स्रोतांद्वारे तथ्य पडताळणी करा.
– खोटय़ा बातम्यांविषयी तत्काळ तक्रार करा.

हे करू नका
– सैन्यदलांच्या हालचालीविषयीची माहिती सामायिक करू नका.
– पडताळून पाहिली नसलेली माहिती कोणालाही पुढे पाठवू नका.
– हिंसा अथवा सामाजिक तणाव निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतील अशा पोस्ट
टाळा.

येथे करता येईल तक्रार
कोणतीही चुकीची माहिती आढल्यास #PIBFactCheck कडे तक्रार करा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी ‘पीआयबी फॅक्ट चेक’ला व्हॉट्सअॅप क्रमांक 8799711259 किंवा [email protected] ई-मेल आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.