
गेल्या दहा वर्षांपासून दरोडा, फसवणूक, खंडणी यांसारखे गुन्हे करणार्या एका तोतया पोलिसाला गुन्हे शाखा युनिट-8 ने बेड्या ठोकल्या. 27 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी खेरवाडी पोलीस त्याला शोधत होते. त्यामुळे त्याला पकडून पुढील कारवाईसाठी खेरवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
संजू सानप ऊर्फ राणे कमांडर (47) असे त्या गुन्हेगाराचे नाव आहे. खेरवाडी पोलीस ठाण्यात 27 लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल असून त्याच्यात स्वतःची ओळख पोलीस सांगणारा संजू सानप हादेखील होता. तो सानप घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची खबर युनिट-8 चे एपीआय शेलकर यांना मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक अजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शेलकर, माने आणि कानडे यांनी सानपला त्या ठिकाणी सापळा रचून पकडले. त्याची चौकशी केल्यावर त्याने गुह्याची कबुली दिली. त्यावेळी तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात खंडणी, दरोडा, फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असून त्याला यापूर्वी वांद्रे, खेरवाडी, सांताप्रुझ, ट्रॉम्बे, गुन्हे शाखा युनिट-7 ने अटक केली होती. सांताप्रुझ पोलिसांनी संजूविरोधात ‘एनबीडब्ल्यू’देखील जारी केली होती.




























































