
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित फरहान अख्तरचा तुफान चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात फरहान अख्तर एका बॉक्सरच्या भुमिकेत दिसणार आहे.
भाग मिल्खा भाग नंतर राकेश ओमप्रकश मेहरा आणि फरहान अख्तर परत एकत्र आले आहेत. त्यांच्यासोबत परेश रावल, मृणाल ठाकूर, डॉ.मोहन आगाशे, सुप्रिया पाठक अशी दमदार स्टारकास्ट आहे.
तुफान २१ मार्च रोजी ऍमेझॉनवर प्रदर्शित होणार आहे. भाग मिल्खा भाग नंतर फरहान अख्तर पुन्हा खेळाडूच्या भुमिकेत दिसणार आहे.





























































