
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेऊन मनाचा मोठेपणा दाखवला, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारवर टीका करणाऱ्यांना आज उत्तर दिले.
उत्तर प्रदेशासह अन्य राज्यांतील निवडणुकांवर डोळा ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतले अशा शब्दांत केंद्र सरकारवर टीका होऊ लागली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या टीकाकारांना उत्तर दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेऊन मनाचा मोठेपणा दाखवला, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारवर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले.#Devendrafadnavis #PMModi #FarmLawsRepealed pic.twitter.com/VlRuSa8CUT
— Saamana (@SaamanaOnline) November 21, 2021
ते म्हणाले की, टीका करणारे टीका करतात आणि काम करणारे लोक काम करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला होता, पण काही लोक त्याला सातत्याने विरोध करीत राहिले. काही लोकांना मी ते पटवू शकलो नाही म्हणून मी हा कायदा मागे घेतला असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितले असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा मोठेपणा फार कमी लोक दाखवतात आणि नरेंद्र मोदी यांनी तो दाखवला. शेतकऱ्यांसाठी ज्यांनी कधीच काही केले नाही तेच लोक टीका करतात. पण किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नऊ हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले. यापूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात कृषी खात्याचा अर्थसंकल्प 35 हजार कोटी रुपयांचा होता, पण आता मोदी यांच्या काळात 1 लाख 35 हजार कोटी रुपयांचा झाला आहे. त्यामुळे टीकाकारांना जनताच उत्तर देईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.




























































