
नगर जिल्ह्यातील अनिल शेळके (वय 42 वर्षे) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.अनिल शेळके हे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात राहत होते. मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शेळके यांनी कांदा पिकवला होता. तो पावसामुळे सडला त्यामुळे त्यांचे चांगलेच आर्थिक नुकसान झाले. कर्जाबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुगली व एक मुलगा असा परिवार आहे.























































