कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

54

सामना प्रतिनिधी, संभाजीनगर

नापिक व सततच्या दुष्काळामुळे हैराण झालेल्या औरंगपुर ता. गंगापूर येथील कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याने आज सोमवारी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. औरंगपुर हर्सुल येथील शेतकरी विठ्ठल बाबासाहेब नवले (55) यांनी आज सकाळी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची बाब सकाळी उघडकीस आली.

त्यांच्यावर ग्रामीण बँकेचे एक लाख रुपये आणि काही उसनवारीचे कर्ज होते. त्यातच नापिकी व दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

आपली प्रतिक्रिया द्या