नापिकीला कंटाळून नगरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नगर

दुष्काळामुळे लोकांना जगणे मुष्कील झाल आहे. सततची नापिकी व दुष्काळाला कंटाळून नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथील एका तरुण शेतकऱयाने आत्महत्या केली. शशिकांत चोभे (35) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

नापिकीला कंटाळलेल्या शशिकांत यांनी विषारी औषधाचे सेवन करून जीवनयात्रा संपवली. तीन दिवसांपूर्वी शेतात जाऊन त्यांनी विषारी औषध घेतले. त्यांच्यावर नगरच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या वडिलांवर शेतीकर्ज आहे. मागील वर्षापासून पडणारा दुष्काळ, पाणीटंचाई या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.