
लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशात लोक आपल्या घरीच थांबले आहेत. या वेळेचा सदुपयोग करत वाशिम जिल्हाच्या एका ग्रामस्थाने आपल्या घराच्या अंगणात एक विहीर खोदली. त्यामुळे त्यांच्या घरच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
Maharashtra: Gajanan Pakmode & his wife from Karkheda village of Washim have dug a 25-feet deep well at the premises of their house in 21 days. Gajanan says,”due to #CoronavirusLockdown we couldn’t go outside. So my wife and I decided to do something.” pic.twitter.com/mSFcsk7Diu
— ANI (@ANI) April 21, 2020
वाशिम जिल्ह्यातील करखेदा गावात गजानन पकमोडे राहतात. लॉकडाऊन जारी केल्यानंतर कोणीच घराबाहेर पडायचे नाही असे आदेश होते. तेव्हा गजानन यांनी घराच्या अंगणात विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या पत्नीला जमिनीची पूजा करायला सांगितली आणि कुदळ फावडे घेऊन काम सुरू केले. या खोदकामात त्यांनी कुठल्याह्ही मशिनीचा वापर केला नाही. त्यांचे हे काम बघून शेजारी त्यांना टोमणे मारत होते. परंतु गजानन यांनी काहीच ऐकले नाही. खोदकाम सुरू केल्यानंतर 21 व्या दिवशी पाणी लागले. 25 फुटांवर पाणी लागल्यावर गजानन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एकच जल्लोष केला. स्थानिक भागात पाण्याचा प्रश्न बिकट होता. नळाकडे बघण्यापेक्षा विहीर खोदण्याचा पर्याय चांगला होता अशी प्रतिक्रिया गजानन यांनी दिली.























































