कन्हेरी येथे वीज पडून शेतकरी मृत्यूमुखी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

औसा तालूक्यातील कन्हेरी येथे वीज अंगावर पडल्याने शेतकरी मृत्यूमुखी पडल्याची घटना सायंकाळी पाच वाजता निदर्शनास आली.

मौजे कन्हेरी येथील शेतकरी सुभाष लिंबाजी चव्हाण (वय ६०) हे शेतात जनावरांना वैरण, पाणी करण्यासाठी शेतात गेले होते. वीज अंगावर पडल्याने त्यांच्या मृत्यू झाला. विलास नरसींग घोडके यांनी दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.