
कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन अजूनही सुरू आहे. आज शनिवारी दुपारी 12 ते 3 दरम्यान शेतकर्यांनी देशभरात चक्का जाम करण्याचे जाहीर केले होते. शेतकरी नेत्यांनी दिल्लीत चक्का जाम न करण्याचा निर्णय घेतला आहे, तरी पोलीस सतर्क आहेत. प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसेनंतर पोलिसांनी कुठलाच धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीसह हरयाणा आणि पंजाब राज्यांच्या सीमांवर सुरक्षा वाढवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टिकरी, सिंघु आणि गाझीपूर सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्लीतही अंतर्गत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नवी दिल्लीच्या पोलिसांनी मेट्रो अधिकार्यांना पत्र लिहून मेट्रोचे 12 स्थानक बंद करण्याची तयारी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकर्यांशी कुठलीही चर्चा झालेली नाही. शेतकरी दिल्लीत आंदोलन करणार नाहीत ही माहिती इतर माध्यमांतून कळाल्याचे पोलिसांनी सांगितले. असे असले तरी दिल्ली पोलिसांनी पूर्ण बंदोबस्त ठेवला असून या भागात अर्ध बल सैनिकही तैनात करण्यात आले आहेत.
सीमेवर बॅरिकेड्स
दिल्ली पोलिसांनी राज्याच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स लावले आहेत. इतकेच नाही तर खिळेही ठोकले आहेत, जेणेकरून शेतकर्यांच्या गाड्यांचा जत्था रोखता येईल. आंदोलन शेतकर्यांपैकी बहुतांश शेतकरी उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये आहेत. दिल्ली सीमेवर आंदोलक शेतकर्यांचे प्रमाण कमी आहे.
नोएडा, गाजिबाद आणि गुरूग्राममध्ये कडक सुरक्षा
शेतकर्यांनी चक्का जाम करण्याचे जाहीर केल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त केला. दिल्ली फरीदाबाद, नोएडा गाजियाबद आणि गुरूग्राम पोलिसही अलर्टवर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये चक्का जाम करणार नसल्याचे शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे. असे असले तरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
























































