दुष्काळाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

योगेश पाटील । हिंगोली

सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील शेतकरी गणेशराव नामदेवराव वडकुते (62) यांनी दुष्काळामुळे झालेली नापिकी व कर्जाला कंटाळून शेतातील गोठ्यामध्ये लाकडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी 27 नोव्हेंबरला घडली आहे.

पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार, विकास वडकुते हे सकाळी दूध आणण्यासाठी शेतात गेले होते. त्यावेळी त्यांना गणेशराव यांनी शेतातील गोठ्यात टिनपत्राच्या लागडाला गळफास घेतल्याचे आढळले. त्यानंतर वडकुते यांच्या फिर्यादीवरुन गोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सततची नापिकी तसेच कर्जाला कंटाळून वडिलांनी आत्महत्या केल्याचे मुलांनी दिलेल्या जबाबात म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले. गणेशराव वडकुते यांच्यावर बँकेसह खाजगी सावकाराचेही कर्ज असल्याचे सांगण्यात आले.