समृद्धी महामार्गाचा पहिला बळी, शेतकऱ्याची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । अमरावती

समृद्धी महामार्गाच्या कामासाठी लागणारा मुरुम खोदण्यात येऊ नये या मागणीसाठी विरोध करणाऱया अनिल चौधरी यांनी विष प्राशन केल्यामुळे त्यांचा आज सकाळी येथील सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. अनिल चौधरी समृद्धी महामार्गाचे पहिले बळी ठरले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सध्या सुरू असून हा मार्ग नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव या गावाजवळून जात आहे. पिंपळगाव शेजारीच लोहगाव असून अनिल चौधरी हे या भागाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत.

13 जून दुपारी अनिल चौधरी जिल्हाधिकाऱयांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आले होते. उशिरापर्यत जिल्हाधिकाऱयांना त्यांना चर्चेसाठी बोलविले नाही. त्यामुळे बैचेन झालेल्या अनिल चौधरी यांनी स्वतःच्या खिशात सोबत आणलेली विषाची बाटली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रतीक्षागृहातच पिऊन टाकली.