कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभय मिरजकर । लातूर

निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु. येथील तरूण अल्प भुधारक शेतकरी तानाजी संभाजी शिंदे (३८) यांनी बुधवारी आपल्या राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याने आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी व आईच्या इलाजासाठी अनेक पाहुण्यांकडून हातऊसने स्वरुपात ३ लाख रूपये घेतले होते. शिंदे यांना २ एकर जमीन होती. त्यातच काबड कष्ट करणे, मोलमजूरी करूण आपला उदरनिर्वाह चालवाचे परंतु, लोकांचे देणे द्यायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. देणेकऱ्यांनी पैशासाठी तगादे सुरू झाले, घरात खायचे वांदे, मुलांचे शिक्षण, आईच्या आजाराला लागणारे पैसे या सर्व बाबीला कंटाळून तानाजी शिंदे यांनी आत्महत्या केली.