
निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु) या गावी तानाजी बाबूराव सूर्यवंशी (वय45 ) या शेतकऱ्याने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या तसेच पीक कर्जाच्या आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. तानाजी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असून मुलीगी उच्च शिक्षण घेत आहे. तिच्या पुढच्या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ नसल्यामुळे ते चिंतेत होते.
तानाजी रात्री शेताकडे बैलांना चारा पाणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी पिरवाडी (अं.बु) शिवारातील स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला दोरखंडाच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मृताचे भाऊ शिवाजी सूर्यवंशी यांनी पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र अंबुलगा येथे शवविच्छेदनसाठी पाठवला.

























































