राज्य सरकारच्या मदतीचे शेतकऱ्य़ांकडून स्वागत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मानले आभार           

अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीबद्धल सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्य़ानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

जिल्ह्यातील विविध तालुक्यात गेल्या आठवडय़ात अतिवृष्टीमुळे शेती, फळबागा, घरे, पशुधनाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौरे करुन परिस्थितीची माहिती घेतली होती. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्यातील नुकसानीबाबत सविस्तर माहिती दिली होती. राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारने दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. या मदतीबद्दल शेतकऱ्य़ानी आभार मानले आहेत. मोहोळमधील शेतकरी शिवलिंग नाईक, उमेश मोटे, ब्रिजेश शर्मा यांच्यासह अनेक शेतकऱ्य़ानी आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या