शेतकऱ्याचे विक्रमी उत्पादन, दोन एकारात घेतले 110 क्विंटल धानाचे पीक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका एकरामध्ये धानाचे उत्पादन फार फार किती होईल ? धानपीक चांगले जमून आले तरं 15 ते 20 क्विंटल. अशात  ब्रह्मपुरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने कमालच केली. दोन एकरामध्ये तब्बल 110 क्विंटल धान पिकवलं. या शेतकऱ्याची दखल चक्क कृषी विभागाने घेतली. जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांक या शेतकऱ्याने पटकावला.

गजानन हरी वैध असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते ब्रह्मपुरी तालुक्यातील कुर्दा गावातील रहिवासी आहेत. गजानन हरी वैध यांच्याकडे तीन एकर शेती आहे. सिंचनाची कुठलीच सुविधा त्यांच्याकडे नाही. नैसर्गिक पाण्यावरच त्यांची शेती अवलंबून आहे. शेती पूरक व्यवसाय म्हणून ते दुग्ध व्यवसाय सुद्धा करतात. यात त्यांना पत्नी, मुले मदत करतात. मागील वर्षी निसर्ग कोपला. अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या फटका शेतीला सोसावा लागला. अश्या स्थितीतही वैध यांनी धानाचे विक्रमी उत्पादन घेतले. वेळोवेळी कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळाल्याने हे साध्य झाल्याचे वैद्य म्हणाले.