
सामना प्रतिनिधी । राहाता
सातबारा कोरा करावा ,हमीभावाबाबद स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी, दूधाला किमान ५०रुपये लिटर भाव द्यावा, कृषीपंपासाठी २४ तास विद्युत पुरवठा करावा यासह अनेक मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी किसान क्रांतीमार्फत २६ जानेवारी पासून देता की जाता या आंदोलनाअंर्तगत पुणतांबा परिसरातील महिला व कृषी कन्यांनी काल १२ वाजेपासून येथील स्टेशन रोडलगत असलेल्या किसान क्रांती मैदानात धरणे आंदोलन केले. आज सकाळी ९ वाजेपासून आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी मागण्या मान्य होईपर्यंत अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती निकिता जाधव हिच्यासह धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या कृषी कन्यांनी दिली. जाधव हिने आम्ही कृषी कन्या आंदोलनात का उतरत आहोत याची कारणीमीमांसा स्पष्ट केली.
१ जून२०१७ रोजी किसान क्रांती मार्फत पुणतांब्यापासून सुरु झालेल्या शेतकरी संपाच्या आंदोलनाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळासोबत केलेल्या चर्चेच्या वेळी शेतकऱ्याच्या बहुतांशी मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र सरकारने अजूनही आश्वासनाची पूर्ती केली नाही. त्यामुळे खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करणाऱ्या सरकारला जागम करण्यासाठी आम्ही परिसरातील शेतकऱ्यांच्या मुली आंदोलनात उतरत असल्याचे स्पष्ट केले व किसान क्रांतीची मशाल पेटविली. यावेळी शुंभागी संजय जाधव साक्षी राजेंद्र जाधव पूनम राजेंद्र जाधव दिपाली सुधाकर जाधव गायत्री मधुकर जाधव ज्ञानेश्वरी संजय शेरकर, गीता अभय धनवटे, श्रेया प्राणिल शिंदे, पल्लवी प्रशांत डोखे समीक्षा प्रशांत डोखे सह अनेक कृषी कन्या व माहिला उपस्थित होत्या शेतकरी संपाचे गाव अशी ओळख असणाऱ्या पुणतांबा गावात कालपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या मुलींनी आंदोलन सुरु केल्यामुळे गाव पुन्हा चर्चेत आले आहे आंदोलनात कृषी कन्यांचा सहभाग असला तरी पुणतांब्यात नगर जिल्हयातील किसान क्रांतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आदोलंन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. १९ फेबुवारीपर्यंत चालणारे आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र व व्यापक करण्याचा निर्धार संयोजकांनी व्यक्त केला आहे.



























































