
शेतमालासाठी आधारभूत किंमत कायद्यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱयांनी ‘चलो दिल्ली’ची गर्जना केली आहे. दिल्ली गाठणारच, असा शेतकऱयांचा निर्धार असून हे आंदोलन बुधवारी आणखी चिघळले. दिल्लीच्या सीमेवर निमलष्करी दल आणि शेतकऱयांमध्ये चकमक उडाली. ड्रोनच्या माध्यमातून अश्रुधुराच्या नळकांडय़ा पह्डण्यात आल्या तसेच रबरी गोळ्यांचा वर्षावही केला. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांवर खऱया गोळ्या झाडल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. शंभू आणि खनौरी सीमेवरून हरयाणात प्रवेश करण्याचा शेतकऱयांचा प्रयत्न असल्याचे किसान मजदूर मोर्चाचे समन्वयक सर्वनसिंह पंढेर यांनी सांगितले.




























































