
शेतकरी दुष्काळाने होरपळून निघत आहे. या संकटातून शेतकऱयांना वाचविण्यासाठी तातडीने दुष्काळ जाहीर करून सर्व सवलती देण्यात याव्यात, या मागणीसाठी तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे शेतकऱयांनी बैलगाडी आणि जनावरांसह विजापूर-गुहागर राज्यमार्ग रोखून धरला. या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
परिसरातील योगेवाडी, उपळावी, सावर्डे, गव्हाण, वज्रचौंडे, वाघापूर, कौलगे, खुजगावसह आठ ते दहा ग्रामपंचायतींनी आंदोलनस्थळी भेट देऊन लेखी पाठिंबा दिला. आमदार सुमन पाटील यांनी आंदोलनस्थळी उपस्थिती लावली.
आज सकाळी दहा वाजता मणेराजुरीच्या मुख्य चौकात आंदोलन सुरू झाले. माजी जि.प. सदस्य सतीश पवार, तासगाव बाजार समितीचे संचालक खंडू पवार, सदाशिव कलढोणे, रोहित कलढोणे, अरुण पवार, दामू पवार, दत्ता हावळे यांच्यासह आंदोलकांनी महावीरचक्र विजेते पांडुरंग साळुंखे यांच्या पुतळ्याजवळ विजापूर-गुहागर राज्यमार्ग रोखला. आंदोलकांनी बैलगाडी आणि जनावरे रस्त्यावर बांधल्यामुळे काही वेळातच रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. मणेराजुरी मंडल अधिकारी राजश्री सानप आंदोलनस्थळी दाखल झाल्या. मात्र, तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी आंदोलनस्थळी यावे, या मागणीवर आक्रमक आंदोलक ठाम होते. तब्बल दोन तास आंदोलन सुरू होते. आमदार सुमन पाटील, तहसीलदार रवींद्र साळुंखे आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळीही आंदोलकांनी कृषी विभागाच्या अधिकाऱयांवर आरोपांच्या फैरी झाडल्या.
यावेळी हणमंतराव देसाई, संजय जमदाडे, अरुण पवार, दादासो पवार, विठ्ठल पवार, सचिन जमदाडे, बबन जमदाडे, सदाशिव कलढोणे, अमोल वाघमारे, विजय जमदाडे, रोहित कलढोणे, विलास जमदाडे, सोसायटीचे चेअरमन बाळासो जमदाडे, बबन लांडगे अशोक पवार, बंडू म्हेत्रे, गणी पठाण, उदय हिंगमिरे, सोनू पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
शेतकऱयांच्या मागण्या
तातडीने दुष्काळ जाहीर करा, पेरणीची खरी आकडेवारी निश्चित करा, 50 पैशांच्या आत पीक पैसेवारी जाहीर करा, टंचाई जाहीर करा, टंचाई निधीतून तलाव, शेततळी, ओढे, नाले भरून द्या. शेतकऱयांची सरसकट कर्जमाफी करा. वीजबिल आणि पाणीपट्टी माफ करा. बारमाही बागायती पिकांसाठी पीकविमा द्या, समाधानकारक पाऊस होत नाही, तोपर्यंत म्हैसाळ, टेंभू, ताकारी आणि आरफळ योजनेतून शेतीला पाणी द्या, नियमित कर्जफेड करणाऱया शेतकऱयांना अद्याप 50 हजारांचे अनुदान मिळाले नाही, ते त्वरित देण्यात यावे.






























































