
इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर डिझेल-पेट्रोलची टंचाई व भविष्यातील खबरदारी म्हणून प्रशासनाकडून डिझेल-पेट्रोल विक्रीवर निर्बंध घालण्यात आले होते. तसेच साठेबाजी होऊ नये, यासाठी कॅनमधून विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, शेतीच्या कामांसाठी ट्रक्टर, रोटावेटर मळणी यंत्र पंपावर आणणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर आणि शेतकऱयांच्या मागणीनुसार या निर्णयात
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुधारणा करण्यात आल्याची माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली आहे.
या निर्णयामुळे शेतीकामांसाठी शेतकऱयांना आत्ता कॅनमधून डिझेल देण्यात येणार आहे. मात्र, याचा गैरवापर करून अवैध साठा चढय़ा दराने विक्री केल्यास गंभीर गुन्हे दाखल करू, असा इशारा तहसीलदार ठोकडे यांनी दिला आहे.
या संदर्भात युवासेना तालुका युवा अधिकारी शंभूराजे फरतडे यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी व तहसीलदारांशी संपर्क साधून शेतकऱयांचा हा प्रश्न उपस्थित केला होता. यावर प्रशासनाकडून सकारात्मक विचार झाल्याने फरतडे यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.


























































