कृषी उपकरण उद्योगासाठी वर्ष 2021: अनेक आव्हानांचा समावेश आणि भविष्याबद्दल आशा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील शेती क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक असून हे क्षेत्र अर्थव्यवस्थेमध्ये मोलाचे योगदान देते, तसेच या क्षेत्रामध्ये पारंपरिक मूल्यही रुजलेली आहेत. हे क्षेत्र कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर आणि नंतर पिकाच्या विक्रीवर अवलंबून आहे. 2021 मध्ये विविध कारणांमुळे या दोन्ही पैलूंवर दुष्परिणाम झाला. शेती क्षेत्रामध्ये शेती उपकरणे महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यांना शेतकरी, उद्योजक व सरकार यांच्याकडून अधिक महत्त्व दिले जाऊ लागले आहे.

कच्च्या मालाची उपलब्धता व किंमत आणि कामगारांची कमतरता यामुळे 2021 मध्ये शेती उपकरणांची निर्मिती करणाऱ्या उद्योगाने अनेक आव्हानांचा सामना केला. कोविड महामारीमुळे शेतीच्या कामांमध्ये, तसेच पीक काढणी करू शकण्याच्या व पिकाची विक्री करण्याच्या कामामध्ये निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांकडून मागणी घटल्याचाही परिणाम झाला.

परंतु, हे अडथळे तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी लोक निरनिराळे उपाय शोधत आहेत. नवीन तंत्रज्ञान, उत्पादने व व्यवस्थापन यंत्रणा तयार करण्यासाठी उद्योग क्षेत्र आणि सरकार सातत्याने गुंतवणूक करत आहेत.

किसानक्राफ्टचे प्रमोटर मॅनेजिंग डायरेक्टर, रवींद्र के. अग्रवाल म्हणतात करोना व्हायरसच्या महामारीच्या कालावधीमध्ये किसानक्राफ्टने 2 वर्षांमध्ये नवीन कारखाना बांधून पूर्ण केला, तसेच इंटर-कल्टिव्हेटरची निर्मिती करणारी ही भारतातील पहिली कंपनी ठरली आहे. कंपनीने देशांतर्गत बाजाराबरोबरच निर्यात क्षेत्रालाही आकृष्ट केले आहे. भारतात अधिक उत्पादनांचा विकास व निर्मिती करण्यासाठी किसानक्राफ्ट यापुढेही गुंतवणूक करणार आहे.

शेतकऱ्यांना माहिती उपलब्ध करणे, पुरवठा साखळीशी संबंधित समस्या सोडवणे, इनपुट व उपकरणे यांच्या उपलब्धतेला चालना देणे यासाठी इंटरनेटवर आधारित सुविधा विकसित करण्याच्या हेतूने किसानक्राफ्टसह अनेक कंपन्या प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना मदत व्हावी, या दृष्टीने किसानक्राफ्टने शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांना उपकरणे भाड्याने देण्याची प्रवर्तक सेवा सुरू केली आहे. अनेक कंपन्या आणि सरकार सिंचन, रोग व पीक व्यवस्थापन, इ. कामांसाठी सॅटेलाइटवर आधारित सुविधा, पेस्ट कंट्रोलसाठी ड्रोनवर आधारित उपाय, बॅटरीवर चालणारे ट्रॅक्टर विकसित करत आहेत.

प्लॅनेट मार्केट रिपोर्ट्सच्या मते, भारतातील कृषी यंत्रसामग्री क्षेत्राची उलाढाल 2024 पर्यंत 901.41 अब्ज रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र 2019 ते 2024 या कालावधीत CAGR 10.70 टक्के प्रगती करेल, असा अंदाज आहे. 2018 मध्ये भारतातील कृषी यंत्रसामग्री क्षेत्राची उलाढाल 498.04 अब्ज रुपये (6.5 अब्ज डॉलर) होती, परंतु या क्षेत्राला कोविड महामारीचा तीव्र झटका बसला. भारताची अर्थव्यवस्था कृषीप्रधान असून, निम्म्याहून अधिक लोकसंख्येला शेतीमुळे उदरनिर्वाहाचे साधन मिळाले आहे. शेती व संबंधित क्षेत्रांनी 2019 मध्ये देशाच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टमध्ये (जीडीपी) 16% योगदान दिले. म्हणूनच, 2022 या वर्षामध्ये यांत्रिकीकरणासाठी विशेष प्रयत्न होण्याची आणि कृषी यंत्रसामग्री क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.