वर्ल्डकपवेळी अनुष्काला चहा द्यायचे निवड समितीचे सदस्य, माजी क्रिकेटपटूचा गौप्यस्फोट

1505

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या वेळी टीम इंडियाच्या खेळाडूंना त्यांच्या पत्नीला सोबत नेण्याची परवानगी देण्यात आली होती. यावेळी विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील त्यांच्यासोबत इंग्लंडला गेली होती. अनुष्काच्या या दौऱ्याच्यावेळी घडलेल्या एका धक्कादायक गोष्टीचा खुलासा माजी क्रिकेटपटूने केल्याने हिंदुस्थानच्या क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

farookh-engineer

माजी विकेटकिपर आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांनी टीम इंडियाच्या निवड समितीला फटकारले आहे. तसेच यावेळी त्यांनी निवड समितीचे सदस्य विश्वचषकादरम्यान अनुष्का शर्माला चहा नेऊन द्यायचे असा गंभीर आरोप देखील केला आहे. ‘मी विश्वचषक पाहायला गेलो तेव्हा तिथे जे मी पाहिले ते धक्कादायक होते. निवड समितीतील काही सदस्य अनुष्का शर्माला चहा नेऊन देत होते. हा प्रकार निंदनीय होता’, असे इंजिनिअर यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. या मुलाखतीत त्यांनी निवड समितीला मिकी माऊस देखील म्हटले आहे.

यावेळी त्यांनी विश्वचषकाआधी चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूचा वाद सोडवता न येण्यावरून देखील निवड समितीला झापले आहे. ‘निवड समितीतल्या एकाही व्यक्तीला खेळाचा अनुभव नाही. त्यामुळे या व्यक्ती चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार या महत्त्वाच्या प्रश्नावर तोडगा काढू शकले नाहीत. निवड समितीत दिलीप वेंगसरकर यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीची गरज आहे’, असे देखील फारुख इंजिनिअर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या