फॅशन पॅशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनय बेर्डे

फॅशन म्हणजे : काहीही. फॅशन म्हणजे एक क्रांती आहे. फॅशन तुमच्या व्यक्तिमत्त्वाला व्यक्त करते.

फॅशन तुमच्या मनातील गोष्ट लोकांपर्यंत आणण्यासाठी कधीकधी मदतही करते.

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देतोस? : मला पांढरा शर्ट आणि डेनिमची जीन्स घालायला आवडते. शिवाय मी कार्यक्रमांवर ठरवतो की नेमके कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे ते.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की? : नाही. फॅशन म्हणजे फक्त कपडे नाही. त्यात तुमची हेअरस्टाईल आली, तुमच्या चेहऱ्याची ठेवण, तुमची मानसिकता या सगळ्या गोष्टी फॅशनमध्ये येतात.

आवडती हेअरस्टाईल? : नव्वदच्या काळातली संजय दत्तची हेअरस्टाईल मला आवडते.

फॅशन जुनी की नवी? : जुन्या गोष्टी आवडतात. मला बेलबॉटम आवडत नाही, पण जितेंद्रची पांढरे शूज आणि पांढरी जीन्स ही फॅशन फार आवडते. जुन्या आणि नवीनमधल्या काही गोष्टी आवडतात.

आवडता रंग? : निळा, लाल आणि पांढरा.

तुझ्या जवळच्या माणसांना तुझी कोणती फॅशन आवडते : मी आईला सगळ्या कपड्यांमध्ये आवडतो. जवळच्या माणसांना कॅज्युअल आऊट फिटमध्ये आवडतो.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का? : हो भरपूर. मुळात मी स्ट्रीट शॉपिंगच जास्त करतो. कॅज्युअल कपडे मॉलमधून घेतो. पण व्हरायटी आणि काहीतरी वेगळं हवं असेल तर मी चार-पाच दुकाने फिरणार आणि त्यात हटके काहीतरी शोधून स्वत:चा पेहराव तयार करतो. शॉपिंग करताना सोबत आई असते.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करतोस? : शूज

काय आवडते? : घड्याळ

आवडता ब्रॅण्ड : झारा, एचएनएन, मुफ्ती

फॅशन फॉलो कशी करतोस? : सोशल मीडियावर सतत काहीतरी नवीन येत असते. कलाकार, मॉडेल काहीतरी नवीन करत असतात. एखाद्या चित्रपटातील फॅशन आवडली तर ती फॉलो करण्याचा मी प्रयत्न करत असतो.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी? : आजकाल सोशल मीडिया इतके पसरले आहे की जाणूनबुजून अपडेट राहण्याची गरज लागत नाही. तुम्ही सहज अपडेट होता.

ब्युटी सिक्रेट : हवं ते खातो, व्यायाम करतो आणि अनुवांशिक सुंदर असल्याने वेगळं काही करावे लागत नाही.

टॅटू काढायला आवडेल का? : नाही. मला वाटते की कलाकाराने आपल्या शरीरावर कायमस्वरूपी असे काही करू नये. टॅटू हा एकदा काढल्यावर पुसता येत नाही. उद्या जर एखादा चित्रपट आला आणि त्या भूमिकेला टॅटू शोभत नसेल तर त्याची अडचण भासू शकते. त्यामुळे कलाकाराने टॅटू काढावे पण अशा जागी काढावेत की कुठल्याही भूमिकेच्या आड ते येणार नाहीत.

तुझ्या बॅगेत हमखास आढळणाऱ्या या तीन गोष्टी : गॉगल, डिओ, वेट वाईप्स.

फिटनेससाठी… : आठवड्यातून पाच वेळा व्यायाम करा. खेळ खेळा किंवा जिम करा आणि चांगले पौष्टिक खा.