
सामना ऑनलाईन । हैदराबाद
हैदराबादमध्ये एका निष्ठुर बापाने दारूच्या नशेत स्वत:च्या तीन वर्षांच्या मुलाला जोरात रिक्षावर आपटल्याची भयंकर घटना समोर आली आहे. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानंतरही त्याने बाळाला जोरात जमिनीवर आदळले. बायकोसोबत भांडण झाल्यानंतर त्याने हा असा भयंकर प्रकार केला आहे. याप्रकरणी सुरुवातीला त्याची बायको त्याच्या विरोधात तक्रार दाखल करायला तयार नव्हती त्यामुळे पोलिसांनी सुमोटो पद्धतीने तक्रार दाखल केली आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
#WATCH Man in an inebriated state bangs his 3-yr-old son against an auto-rickshaw following a quarrel with his wife. Child handed over to Child Welfare Committee. Case registered under Sec 324 of IPC & Sec 75 of the Juvenile Justice Act; Accused absconding (9.07.18) #Hyderabad pic.twitter.com/8YWjfrEdjN
— ANI (@ANI) July 10, 2018
Victim’s mother wasn’t willing to lodge a complaint so police have registered a Suo-moto case under IPC Section 324 (voluntarily causing hurt by dangerous weapons or means and Section 75 of the Juvenile Justice (Care and Protection of Children) Act. Accused absconding. #Hyderabad
— ANI (@ANI) July 10, 2018
व्यवसायाने रिक्षाचालक असलेला आरोपी रविवारी रात्री दारुच्या नशेत तर्राट होऊन घरी गेला. त्यानंतर त्याचे त्याच्या पत्नीसोबत भांडण झाले. या भांडणांनतर त्याने पुढचा मागचा कसलाही विचार न करता त्यांच्या तीन वर्षाच्या बाळाला उचलले व तो बाहेर पळून गेला. त्यानंतर त्याने बाळाला जोरात रिक्षावर आदळले. त्यानंतर पुन्हा एकदा जोरात जमिनीवर आदळले. या बाळाची आई मुलाला परत देण्यासाठी त्याच्याकडे गयावया करत होती तसेच आणखी काही जण त्याला समजविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तो कुणाचेही काहीही ऐकत नव्हता. हा सर्व प्रकार सुरू असतानाच काही स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळविले, मात्र पोलीस येण्यापूर्वीच तो घटनास्थळावरून पळून गेला.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच जखमी बाळाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तसेच त्या बाळाच्या आईला नवऱ्याविरोधात तक्रार दाखल करायला सांगितली. मात्र ती महिला पतीविरोधात तक्रार दाखल करण्यास तयार न झाल्याने पोलिसांनी सुमोटो पद्धतीने तक्रार दाखल केली असून बाळाल बाल विकास समितीकडे सोपविले आहे.
























































