फेसबुक मॅसेंजरवरही आता ‘अनसेंड ऑप्शन’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

व्हॉट्सऍपपाठोपाठ आता फेसबुक मॅसेंजरवरही पाठवलेला मेसेज डिलीट करण्याचा ऑप्शन उपलब्ध होणार आहे. सध्या फेसबुक या ऑप्शनची चाचपणी करीत असून लवकरच फेसबुक मेसेंजरवरही ‘डिलीट फॉर एव्ह्रिवन’ आणला जाणार आहे. एका फेसबुक युजरने याविषयीचा स्क्रिनशॉट रेडिटवर शेअर केला आहे. या स्क्रिनशॉटनुसार मेसेज डिलीट करण्याचे दोन पर्याय उपलब्ध असणार आहे. एक म्हणजे ‘रिमुव्ह फॉर एव्ह्रिवन’ आणि दुसरा ‘रिमूव्ह फॉर यू’. सध्या तुम्ही कोणताही मेसेज केवळ तुमच्यापुरताच डिलीट करू शकता. ज्याला मेसेज पाठविला आहे. त्याच्या अकाऊंटमधून तो मेसेज डिलीट होत नव्हता. पण चाचणी पूर्ण झाल्यावर पुढील ऍप अपडेटमध्ये फेसबुक मेसेंजरमध्ये हे अनसेंड ऑप्शन ऍड केलेले असणार आहे.