एफडीएकडून  ई-सिगारेटवर जप्ती; गॉडफ्रे फिलिप्स, इंडिया कंपनीची हायकोर्टात धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई
एफडीएकडून ई-सिगारेटवर जप्ती घालण्यात आल्याने ई-सिगारेटची निर्मिती करणार्‍या गॉडफ्रे फिलिप्स इंडिया कंपनीने याविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टाने कंपनीला तूर्तास दिलासा देत पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई करू नये असे आदेश ‘एफडीए’ला दिले आहेत.

ई-सिगारेटची निर्मिती, साठवणूक आणि विक्री न करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्यांना दिले होते. सरकारने त्याची दखल घेत 5 मार्च रोजी ई-सिगारेटवर बंदी घातली. त्यानंतर ‘एफडीए’ने 25 जून रोजी कंपनीच्या गोदामात छापे मारले. त्यात काही साठवणूक केलेली ई-सिगारेट ‘एफडीए’ने जप्त करत 6 जुलै रोजी कंपनीला नोटीस धाडली. या नोटीसला आव्हान देत ऍड. अमित देसाई यांच्या वतीने कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेतली.