बिग बॉसला आता महिलेचा आवाज!

1125

बिग बॉस सीझन 13 मध्ये यंदा मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या सर्व सीझनमध्ये बिग बॉसचा आवाज पुरुषाचा होता, पण यंदाच्या सीझनमध्ये एक महिला बिग बॉसचा रोल साकारणार असल्याची चर्चा आहे. बिग बॉसचा आवाज पुरुषाऐवजी महिलेचा असण्याची शक्यता आहे याच महिन्यात बिग बॉस सुरू होणार आहे. याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. याशिवाय यंदाच्या सीजनमध्ये फक्त सेलिब्रिटीच बिग बॉसच्या घरातील सदस्य असणार आहेत. या शोचा प्रिमीयर सोहळा 29 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. यंदा बिग बॉसची हॉरर थीम असणार असून सलमान खानसोबत एक महिला होस्टदेखील असणार आहे. तसेच हिंदी मालिकांमधील सुनांची क्रेझ लक्षात घेता या सुनांपैकी काही जणी बिग बॉसच्या स्पर्धक असण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या