खतांच्या बफर स्टॉकसाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
dadaji-bhuse

राज्यातील खरिपाचे वाढलेले क्षेत्र लक्षात घेता यंदाच्या हंगामात 52 लाख मेट्रिक टन खते उपलब्ध करून द्यावीत. तसेच राज्यात खतटंचाई जाणवू नये यासाठी करण्यात येणाऱ्या बफर स्टॉकच्या खर्चापोटी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे, अशी मागणी केंद्रीय खते व रसायनमंत्री भगवंत खुबा यांच्याकडे केल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात यंदा 1 कोटी, 45 लाख हेक्टरवर खरिपाची लागवड अपेक्षित आहे. खरीप हंगामात 85 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन आणि कापूस लागवड होणार आहे. त्यासाठी पेरणीवेळी खते आवश्यक असतात. खरीप हंगामातील खतांची मागणी पाहता 52 लाख मेट्रिक टन खताची आवश्यकता भासणार आहे. मात्र केंद्र सरकारने 45 लाख मेट्रिक टन खताचा कोटा मंजूर केला आहे. तो वाढवून दिला पाहिजे. तसेच एप्रिल, मे आणि जून महिन्यात देण्यात येणारी खते वेळेत द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.