खतांचेही भाव वाढले, उद्ध्वस्त शेतकरी महागाईच्या चक्रव्यूहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

पेट्रोल, डिझेल, गॅसच्या काढलेल्या दराने महागाईचा भडका उडाला असल्याने सामान्य जनता हतबल झाली असताना आता खतांच्या किमतीतही १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. खतांच्या किमती वााढल्याने शेतकऱयांच्या मालाची उत्पादन किंमतही वाढणार असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्जाच्या खाईत अडकलेल्या शेतकऱयांना यंदा सरकारच्या कृपेने खत उत्पादकांनी वाढवलेल्या खतांच्या किमतीचा फटका सहन करावा लागणार आहे.