
कोपरी-आनंदनगर प्रभागात यंदा नवीन उमेदवार द्या, अशी मागणी आज तेथील स्थानिक शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली. खासदार नरेश म्हस्के यांनी या प्रभागातून त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्याची तयारी केल्याचे कळताच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला.
नरेश म्हस्के पूर्वी आनंदनगर प्रभागातून नगरसेवक होते. मात्र ते आता खासदार झाल्याने या प्रभागातून म्हस्पेंनी त्यांचा मुलगा आशुतोष म्हस्के याला पालिका निवडणुकीत उतरवण्याची तयारी केली आहे. मात्र आनंदनगरमधील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी याला विरोध केला आहे. शिंदे गटाच्याच एका मंत्र्यांच्या नातलगाने म्हस्के यांच्या पुत्राला उमेदवारी देऊ नका अशी मागणी केली आहे. प्रमोद गोगावले, मंगेश कदम, सचिन झांजे, अभिषेक शिरावले यांनी या उमेदवारीला विरोध करत घोषणाबाजी केली.





























































