मुंबईत आज हिंदुस्थान सलामीला भिडणार स्वीडनशी

218

हिंदुस्थानात पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या फिफा महिला अंडर-17 फुटबॉल विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून मुंबईच्या शहाजी राजे क्रीडा संकुल मैदानावर अंडर-17 आंतरराष्ट्रीय तिरंगी महिला फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत उद्या सलामीला यजमान हिंदुस्थानी महिला संघ युरोपियन संघ स्वीडनला भिडणार आहे.युरोपियन फुटबॉल महासंघाने या स्पर्धेचे आयोजन हिंदुस्थानी फुटबॉल महासंघाच्या सहाय्याने केले आहे. स्पर्धेतील तिसरा संघ आशिया खंडातील थायलंड आहे. विशेष म्हणजे हिंदुस्थानी महिला संधी स्वीडीश प्रशिक्षक थॉमस डेनरबाय यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा खेळणार आहे. या स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून हिंदुस्थानी महिला संघाला प्रशिक्षक डेनरबाय यांनी कडक सराव दिला होता.

हिंदुस्थानी संघातील अनेक महिला फुटबॉलपटू प्रतिभावंत आणि जिगरबाज असल्याचे मत प्रशिक्षक डेनरबाय यांनी अंधेरी क्रीडा संकुलात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. गेल्या काही दिवसांतील सरावावरून हिंदुस्थान स्वीडनच्या संघाला चांगली झुंज देईल, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या