
सामना ऑनलाईन ,कझान
स्ट्रायकर दिएगो कोस्टा याने ५४व्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलच्या जोरावर स्पेनने इराणचा १-० गोलफरकाने पराभव करून फिफा वर्ल्डकपमधील विजयाचे खाते उघडले. दिएगो कोस्टाचा कर्ल्डकपमधील दुसऱ्या सामन्यातील हा तिसरा गोल होय. या किजयासह स्पेनने ‘ब’ गटात अक्कल स्थानी झेप घेतली. स्पेनचा पहिला सामना बरोबरीत सुटला होता. तर इराणकिरुद्ध स्पेनला विजय मिळाल्याने त्यांच्या खात्यात एकूण ४ गुण जमा आहेत.
पोर्तुगालविरुद्धचा सामना बरोबरीत सुटल्याने स्पेनसाठी इराणकिरुद्धचा सामना महत्त्काचा होता, तर दुसरीकडे इराणने पहिल्या सामन्यात मोरोक्कोकर मात केल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणाकला होता. त्यामुळे स्पेन-इराण लढतीकडे तमाम फुटबॉलशौकिनांचे लक्ष लागले होते.
कझान स्टेडियमकर रंगलेल्या या सामन्यात इराणने स्पेनला चांगली टक्कर दिली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. विशेषतः स्पेनच्या खेळाडूंना रोखण्यात इराणच्या बचाक फळीला यश आले. दुसऱ्या हाफमध्ये स्पेनने आक्रमक खेळ केला आणि यात त्यांना यशही आले. ५४ क्या मिनिटाला डिएगो कोस्टाने गोल मारून संघाला १- ० अशी आघाडी मिळवून दिली. सहकारी खेळाडू इनिएस्ताने बॉक्सच्या आतमधून दिलेल्या पासकर कोस्टाने चेंडू अलगद गोलजाळीत ढकलून विश्कचषकात स्वतःचा तिसरा गोल नोंदविला. इराणच्या बचाक फळीने आणि गोलरक्षकाने स्पेनला चांगलेच झुंजवले. इराणनेही एक गोल मारला खरा, मात्र ऑफसाइडमुळे तो गोल पात्र ठरला नाही. यामुळे इराणच्या खेळाडू आणि चाहत्यांमध्ये नाराजी पसरली. निर्धारित ९० मिनिटानंतर पाच मिनिटांच्या इन्जुरी टाइममध्ये इराणने किजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र स्पेनने केळकाढू धोरण अकलंबताच इराणचे खेळाडू हतबल जाणकले.
बाद फेरीसाठी चुरस
फिफा वर्ल्डकपमधील ‘ब’ गटात बाद फेरी गाठण्यासाठी कमालीची चुरस सुरू आहे. स्पेन, पोर्तुगाल व इराण या संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवलेला आहे. या तीनपैकी कोणते दोन संघ बाद फेरी गाठण्यात यशस्वी होणार हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहे.





























































