12 फेब्रुवारीला पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य परीक्षा परिषदेने शालेय शिष्यवृत्ती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 15 डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमार्फत नियमित शुल्क भरून परीक्षा अर्ज करता येणार आहे.

पाचवी ते आठवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य व्हावे, यासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये पाचवी व आठवीला प्रवेश घेतलेल्या सरकारी, अनुदानित, खासगी, विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. दोन्ही इयत्तांसाठी चार पेपर असून प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा चार विषयांची परीक्षा होणार आहे.