ब्रेकिंग – बीडमध्ये पन्नास लाखांची रोकड पकडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवाला माध्यमातून पैसा येण्याची शक्यता वर्तवला जात आहे. या पैशांचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने सर्वच ठिकाणी गाड्यांची झाडाझडती घेतली जात आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता बीड शहरातील बसस्थानक परिसरात एका गाडीमधून पन्नास लाख रुपयांची कॅश जप्त करण्यात आली. ही रोकड नक्की कोणाची आणि कुठून आली याचा तपास केला जात आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगासह प्रशासकीय यंत्रण व वाहतूक पोलीसही सतर्क झाले आहेत. पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता बीड शहरातील बसस्थानक परिसरात वाहतूक शाखेने केलेल्या झाडाझडतीमध्ये एमअच 26 एके-1556 या सिल्व्हर कलरच्या स्विफ्ट गाडीमधून पन्नास लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही गाडी कोठून कोठे जात होती? कॅश कोणाची आहे? याचा तपास केला जात आहे.

beed-cash